मुंबई,दि.१३ : यंदाच्या अर्थसंकल्पामुळे राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मिती, पर्यावरण, पर्यटन क्षेत्राला गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची ही अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर मंगळवार दि. १४ मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.
विधिमंडळात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा, पायाभूत सुविधा भक्कम करणारा पंचामृत अर्थसंकल्प राज्याला प्रगतिपथावर नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.