एक वादळ भारताच-युवा नेतृत्व अभियान

shivam
By -
0

संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्ताने एक वादळ भारताचं युवा नेतृत्त्व अभियान



देशाचा राष्ट्रीय संत प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा व्हावा यासाठी एक वादळ भारताचं ही चळवळ संपूर्ण देशात काम करत आहे. 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाचा अमृत महोत्सव निमित्त देशभरात एक ऐतिहासिक उपक्रम राबवला जाणार आहे . एक वादळ भारताचा या राष्ट्रभक्ती मोहिमेच्या माध्यमातून जागर संविधानाचा जागर अधिकार आणि कर्तव्याचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रगीत गायन जे 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. हा या एक वादळ भारतचं या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. सर्व सामाजिक व धार्मिक ठिकाणी झेंडावंदन व राष्ट्रगीत सादर केले पाहिजे

यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, तसेच शाळा व आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून तरुणांना संविधानाचे अधिकार आणि कर्तव्याबद्दल जागृत करण्यासाठी चळवळ म्हणजेच एक वादळ भारतचं. स्वतंत्र दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हे आपल्या देशाचे दोन मोठे सण आहे. ते सण

उत्सव साजरे करा. सुट्टी नव्हे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे भारतातील प्रत्येक नागरिकाला संविधानाबद्दल जागरूक करणे आहे 26 जानेवारी रोजी देशातील विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे. विशेषता महिला गृहिणी ज्येष्ठ नागरिक कामगार आणि वंचित घटकांचा सहभाग वाढवण्यात येणार असल्याची प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मग सांगितले आहे. देशातील प्रत्येक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन संविधानाच्या मूल्यांना उजाळा द्यावा आणि आपल्या अधिकार व कर्तव्यांबद्दल जागृत व्हावे चला एकत्र येऊन संविधानाचा जागर करूया आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देऊया असे आवाहन वैभव शिंदे पाटील यांनी सांगितले आहे.



Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*