२ मिनिटात ७/१२ उतारा काढायला शिका | 7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे
7/12 Utara in Marathi: ७/१२ व ८अ बघायचा आहे किंवा जमिनीशी सम्बंधित सुविधांचा लाभ Online घेऊ इच्छिता, तर हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
या पोस्ट मध्ये तुम्हाला 7/12 व जमीनी सम्बंधित लाभ
Online कासा घ्याचा
जसे कि तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्र शासनाने 7/12, 8A, भू नकाशा, फेरफार अश्या अनेक सुविंधासाठी Online पोर्टल म्हणजेच वेब्सिते सुरु केली आहे.
कुठल्याही जिल्याचा ऑनलाईन सातबारा बघणे अगदी सोप्पे आहे. सर्व सामान्य माणूस आता घर बसल्या या सुविंधाचा लाभ घेऊ शकतो ते आपल्या फोन किंवा कॉम्पुटरवरून अगदी मोफत.
मित्रानो शासनाने महाराष्ट्र भूमिलेख नावाचं पोर्टल सुरु केलय ज्याचा उपयोग करून तुम्ही ७/१२ व ऑनलाईन पाहू शकतात एवढेच नव्हे तर तुम्ही pdf देखील डाउनलोड करू शकतात
आज आपण याच पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत जसे 7/12 कसा शोधायचा, 7/12 कसा डाउनलोड करायचा, सातबारा उतारा district wise कसा शोधायचा,
अगदी सोप्या स्टेप्स मध्ये आम्ही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय, आणि आशा करतो कि हि पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कधी ७/१२ उतारा काढण्यासाठी सेवा केंद्र वर जावे लागणार नाही.
तर चला मग सुरु करूया आणू पाहूया कि ऑनलाईन सातबारा कसा शोधायचा.
७/१२ उतारा कसा शोधायचा हे जाणून घेण्याआधी आपण सातबारा उतारा बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया.
Topics
7/12 उतारा म्हणजे काय – What Is Satbara Utara In Marathi
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.
यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.
तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं ७ आणि ‘गावचा नमुना’ नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या रूपात दिली जाते.
सबब साताबार्या उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो.त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते.
प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा दर्शवतो.
७/१२ मराठी ऑनलाइन उत्तरा – सातबारा उतारा
चला तर मग आता पाहूया की, ७/१२ कसा शोधा.
वरील फोटो मध्ये दिलेली वेबसाइट आहे महाभूलेख ची, याच वेबसाइट वरून तुम्ही सातबारा पाहू शकता, त्यासाठी खालील प्रमाणे माहिती भरा.
स्टेप १ : bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट ला उघडा ( हि वेबसाइट तुम्ही मोबाईल मध्ये आणि कॉम्पुटर मध्ये देखील पाहू शकतात )
स्टेप २ : तुमचा विभाग निवडा (Select your section)
आता उजव्या बाजूच्या बॉक्स मध्ये तुमचा विभाग निवडा
7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे
आता उजव्या बाजूच्या बॉक्स, जसे तिथे अमरावती विभाग आहेत त्याप्रमाणे तुमचा जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग निवडा,
जर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहित नसेल तर खालील तक्ता पहा.
औरंगाबाद विभाग Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli
अमरावती विभाग Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim
नागपूर विभाग Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
पुणे विभाग Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur
कोकण विभाग Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg
नाशिक विभाग Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik
सातबारा उतारा – विभागानुसार जिल्ह्यांची यादी चा तक्ता (Table of District List by Division in Marathi)
आता विभाग निवडा आणि Go बटनावर क्लिक करा ( आता उदाहरण साठी मी इथे नाशिक निवडलेला आहे )
पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय ? | मुखत्यारपत्र
स्टेप 3 : तुमचा जिल्हा निवडा – Select Your District
विभाग निवडून Go बटन दाबल्यावर असा पर्याय तुमच्या समोर येईल
7/12 Utara in Marathi Online | How To Select District
आता तुम्हाला समोर २ पर्याय दिसतील ७/१२ आणि ८अ
यापैकी तुम्हाला जे हवे असेल तर निवडा आणि खाली तुमचा जिल्हा निवडा.
7/12 Utara in Marathi Online | How To Select District
7/12 Utara in Marathi Online | How To Select District
आता येथे जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
त्यानंतर सर्वे नंबर/गट नंबर टाका किंवा तुम्ही नावाने देखील सर्च करू शकतात
आता शोधा या बटनावर क्लिक करा, आणि तुम्हाला समोर तुमचा ७/१२ दिसेल,
7/12 Utara in Marathi Online
आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा खाली डाउनलोड pdf या बटनावर क्लिक करून pdf देखील डाउनलोड करू शकतात
अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ७/१२ शोधू शकतात.
मित्रांनो तुम्हाला जर अजूनही समजलं नसेल किंवा ७/१२ शोधण्यात अडचण येत असेल तर हा विडिओ पहा
7/12 Utara in Marathi Online Video